जि.प. पोटनिवडणूक : वैध उमेदवारांची यादी झळकली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:46 AM2021-09-22T04:46:32+5:302021-09-22T04:46:32+5:30
वाशिम जिल्हा परिषदेचे ५२ गट आणि जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांच्या १०४ गणांसाठी ७ जानेवारी २०२० रोजी निवडणूक झाली होती. ...
वाशिम जिल्हा परिषदेचे ५२ गट आणि जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांच्या १०४ गणांसाठी ७ जानेवारी २०२० रोजी निवडणूक झाली होती. ओबीसी प्रवर्गातील आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याचा मुद्दा समोर करून संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २७ सदस्यांच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता; परंतु कोरोनास्थितीमुळे जुलै महिन्यात पोटनिवडणूक कार्यक्रमाला (आहे त्या स्थितीत) स्थगिती मिळाली होती. कोरोना नियंत्रणात असल्याने स्थगिती उठविण्यात आली असून, ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. अर्ज पात्र ठरलेल्या वैध उमेदवारांची यादी २१ सप्टेंबर रोजी तहसील स्तरावर प्रसिद्ध करण्यात आली. २७ सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.
......................
२७ सप्टेंबरला चित्र स्पष्ट होणार
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २७ सप्टेंबर असून, त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. महाविकास आघाडी न झाल्यास कुठे तिरंगी तर कुठे चौरंगी लढती होण्याचे संकेत आहेत.
०००००००
जि.प. गट व पं.स. गणासाठी वैध अर्ज
तालुका गट गण
वाशिम ३८ ४८
रिसोड १८ ३१
मानोरा १८ ३३
कारंजा ७ २६
मालेगाव १३ ३५
मं.पीर २८ २३
एकूण १२२ १९६