पोटी येथील जि.प. शाळेचा राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:39 AM2021-05-15T04:39:45+5:302021-05-15T04:39:45+5:30
महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, त्यांच्यात महाराष्ट्राभिमान रुजावा आणि अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अन्य बाबींचे ज्ञान वृद्धिंगत व्हावे, या उद्देशाने ‘महाराष्ट्राची ...
महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, त्यांच्यात महाराष्ट्राभिमान रुजावा आणि अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अन्य बाबींचे ज्ञान वृद्धिंगत व्हावे, या उद्देशाने ‘महाराष्ट्राची गौरवगाथा’ या ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन १ ते १५ मे यादरम्यान करण्यात आले आहे. या उपक्रमात राज्यभरातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेचा निकाल जून महिन्यात जाहीर होणार असून, रोख पारितोषिक व प्रमाणपत्र, असे बक्षिसाचे स्वरूप आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या गौरवाशी निगडित ऐतिहासिक घटना, ठिकाणे, व्यक्ती, प्रसंग यावर आधारित भाषण, गाणे, नृत्य, चित्रकला आदींचा ३ ते ४ मिनिटांचा व्हिडिओ अपलोड करावयाचा होता. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी पोटी शाळेतील शिक्षकांनी व्हाॅटस्ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याची जबाबदारी पदवीधर शिक्षक शरद सुरसे यांनी पार पाडली. शाळेचे मुख्याध्यापक हिरामण म्हातारमारे, शिक्षक राजेंद्र ठोकळ, अनिल वाढणकर यांनी याकामी सहकार्य केले. केंद्रप्रमुख सुदाम भोंडणे, गटशिक्षणाधिकारी सुभाष पवणे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले.