कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरण : तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा योग्य - उज्ज्वल निकम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 03:33 PM2017-11-22T15:33:35+5:302017-11-22T16:22:27+5:30
कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणातील दोषींनी अमानुष कृत्य केलेले असल्याने त्यांना फाशीची शिक्षाच योग्य राहील, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल ...
कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणातील दोषींनी अमानुष कृत्य केलेले असल्याने त्यांना फाशीची शिक्षाच योग्य राहील, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात केला आहे. कोपर्डी खटल्यातील दोन दोषी हे प्रत्यक्ष बलात्काराच्या घटनेत सहभागी नसले, तसा पुरावा नसला तरी ते या घटनेच्या कटात सहभागी असल्याने ते मुख्य दोषीसह फाशीच्या शिक्षेस पात्र आहेत, असाही युक्तिवाद निकम यांनी केला. दरम्यान, दोषींना २९ नोव्हेंबरला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.