अहमदनगर : अजनूजमधील वाळू उपशाचे 'लोकमत'कडे चित्रिकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 04:19 PM2017-12-20T16:19:39+5:302017-12-20T17:01:11+5:30
अहमदनगर, न्यायालयाचा आदेश डावलून, तसेच अटी-शर्ती भंग करत अजनुज ( श्रीगोंदा )येथे वाळू उपसा सुरूच असल्याची माहिती समोर आली ...
अहमदनगर, न्यायालयाचा आदेश डावलून, तसेच अटी-शर्ती भंग करत अजनुज ( श्रीगोंदा )येथे वाळू उपसा सुरूच असल्याची माहिती समोर आली आहे. या वाळू उपशाचे चित्रिकरण ‘लोकमत’ने सोमवारी ( 18 डिसेंबर) केले होते. यंत्राद्वारे वाळू उपसा होत असल्याची कबुली श्रीगोंदा तहसीलदार महेंद्र माळी यांनी ‘लोकमत’ला दिली होती. लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच वाळू उपसा करणा-यांनी यंत्र घेऊन पळ काढला.