Next

संगमनेरमध्ये बसची दुचाकीला धडक, चालकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 06:14 PM2018-03-11T18:14:02+5:302018-03-11T18:52:19+5:30

बसस्थानकातून बस बाहेर पडत असताना वाहतूक कोंडीमुळे बसची दुचाकीला धडक बसली. यात दुचाकी बसखाली सापडून दुचाकीवरील दोघे जण खाली पडले. बसचा वेग कमी असल्याने सुदैवाने घटनेत कुणीही गंभीर जखमी झाले नाही. मात्र, संतापलेल्या दुचाकीस्वारांनी बसचालकाला मारहाण केली. ही घटना आज दुपारी चार वाजेच्या सुमारास बसस्थानकाच्या बाहेर घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कसंगमनेर : बसस्थानकातून बस बाहेर पडत असताना वाहतूक कोंडीमुळे बसची दुचाकीला धडक बसली. यात दुचाकी बसखाली सापडून दुचाकीवरील दोघे जण खाली पडले. बसचा वेग कमी असल्याने सुदैवाने घटनेत कुणीही गंभीर जखमी झाले नाही. मात्र, संतापलेल्या दुचाकीस्वारांनी बसचालकाला मारहाण केली. ही घटना आज दुपारी चार वाजेच्या सुमारास बसस्थानकाच्या बाहेर घडली.संगमनेर आगराची संगमनेर-कोपरगाव बस (क्र. एम. एच ४० एन. ८६०५) घेवून चालक चार वाजेच्या सुमारास बसस्थानकाबाहेर पडला. प्रवाशांनी भरलेली बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ आली. यावेळी स्थानकाबाहेर नेहमीप्रमाणे वाहतुक कोंडी झाली होती. बस बाहेर पडताना नाशिक रस्त्याकडे जाणा-या दुचाकीला धडकल्याने दुचाकीवरील दोघे जण खाली पडले. सुदैवाने या घटनेत कुणीही गंभीर जखमी झाले नाही. मात्र, संतप्त झालेल्या दुचाकीस्वारांनी बस रस्त्यातच अडवून चालकाला मारहाण सुरू केली. यानंतर बराच वेळ रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. स्थानिक नागरिकांनी मारहाण करणा-यांच्या तावडीतून बस चालकाला सोडविले. नेहमीप्रमाणे वाहतुक पोलीस उशिरा येत केवळ शिट्ट्या फुकत बसले. बसस्थानकाच्या नुतनीकरणाचे काम सुरू असुन बसस्थानकाचे एक प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. बसस्थानकाबाहेर प्रवासी वाहतूक करणारी खासगी वाहने भररस्त्यात उभी करत प्रवाशांची चढ-उतर केली जाते. याकडे वाहतूक पोलीस जाणीव पुर्वक दुर्लेक्ष करीत आहेत. बसस्थानक परिसर व इतरही अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या तीव्र बनली असून याकडे वाहतूक पोलिस दुर्लक्ष करत आहेत.