Next

विधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 22:33 IST2018-05-24T22:32:45+5:302018-05-24T22:33:21+5:30

अकोला - विधान परिषदेचे सभागृह हे धनदांडग्यांचे सभागृह होत आहे. ज्याच्याकडे पैसा आहे तोच ही निवडणूक लढवू शकतो असे ...

अकोला - विधान परिषदेचे सभागृह हे धनदांडग्यांचे सभागृह होत आहे. ज्याच्याकडे पैसा आहे तोच ही निवडणूक लढवू शकतो असे आजच्या निकालांवरून दिसते त्यामुळे या सभागृहाची आवश्यकताच नाही असे मत आमदार बच्चु कडू यांनी व्यक्त केले. आज लागलेल्या विधान परिषद निकालांवर त्यांनी आपल्या भाष्य केले. ते आज अकोल्यात बोलत होते. आमदार बच्चू कडू यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी ते जालना जिल्ह्यातील भोकरदन अशी आसुडयात्रा काढली आहे या यात्रेंतर्गत अकोल्यात झालेल्या युवा संवाद मेळाव्यात त्यांनी अशोक चव्हाण, अजित पवार, राज ठाकरे शिरीष महाजन यांच्यावर टिका केली. सत्तेत असतांना या नेत्यांनी शेतकºयांकडे पाठ फिरविली असा आरोप त्यांनी केला.