सर्वोपचार रुग्णालयाच्या एनआयसीयूमधून बाळ पळविण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 11:25 PM2017-11-16T23:25:17+5:302017-11-16T23:25:29+5:30
अकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या बालरोग चिकित्सा विभागातील नवजात शिशू अतिदक्षता कक्षातून (एनआयसीयू)मध्ये एका वेडसर ...
अकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या बालरोग चिकित्सा विभागातील नवजात शिशू अतिदक्षता कक्षातून (एनआयसीयू)मध्ये एका वेडसर महिलेने दिवसाढवळ्या प्रवेश करून स्तनदा मातेकडून तिच्या बाळाला हिसकण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवार, १६ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. यावेळी कर्तव्यावर असलेल्या महिला कर्मचारी व महाराष्ट्र सुरक्षा बोर्डाच्या सुरक्षा रक्षकांनी सतर्कता बाळगून सदर महिलेस पोलिसांच्या ताब्यात दिले. सिटी कोतवाली पोलिसांनी सदर महिलेस अटक केली असून, गुन्हा दाखल केला आहे.