अकोल्यात शेतकरी कामगार पक्षाने केली शेतमालाची होळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 16:47 IST2017-12-11T16:47:24+5:302017-12-11T16:47:53+5:30
- अतुल जयस्वाल अकोला : अस्मानी व सुल्तानी संकटाने पिचून निघालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी शासनाकडून शेतकऱ्याला नागविण्याचेच काम सुरू ...
- अतुल जयस्वालअकोला : अस्मानी व सुल्तानी संकटाने पिचून निघालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी शासनाकडून शेतकऱ्याला नागविण्याचेच काम सुरू आहे. शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकविलेल्या शेतमाल कवडीमोल भावाने विकला जात आहे. शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने अकोला-आकोट मार्गावरील उगवा फाटा येथे सोमवारी सकाळी ११ वाजता शेतमालाची होळी करण्यात आली.