Next

भीषण आग आणि सिलेंडरच्या स्फोटांनी अकोल्यातील मातानगर हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 17:27 IST2018-02-22T17:26:12+5:302018-02-22T17:27:24+5:30

अकोला: रामदास पेठ पोलीस ठाण्याला लागून असलेल्या मातानगरमध्ये गुरुवारी दुपारी भीषण आग लागून पाच ते सहा सिलेंडरचा स्फोट झाला. ...

अकोला: रामदास पेठ पोलीस ठाण्याला लागून असलेल्या मातानगरमध्ये गुरुवारी दुपारी भीषण आग लागून पाच ते सहा सिलेंडरचा स्फोट झाला. आगीच्या तांडवात ५० पेक्षा अधिक झोपडया जळून खाक झाल्या असून मोठी आर्थिक हानी झाली आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही.