अकोला : भारताने जगाला दिलेली विशेष देण म्हणजे योग. दरवर्षी २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. योग दिनानिमित्त अकोला जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अकोला शहरातही जिल्हा प्रशासन आणि विविध संस्था, संघटनांच्या सहकार्याने योग दिनाचा कार्यक्रम पार पडतो. जागतिक योग दिनाच्या पूर्वसंध्येला अकोला येथील सुप्रसिद्ध योग गुरु मनोहर इंगळे गुरुजी यांनी खास ‘लोकमत’च्या आॅलनाईन वाचकांसाठी विविध योगमुद्रा सादर केल्या.