अकोला : मराठा समाजाला आरक्षण देण्यासोबतच विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने शुक्रवारी अकोल्यात खासदार संजय धोत्रे व आमदार रणधीर सावरकर यांच्या निवासस्थानासमोर झोपमोड आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी ‘गोंधळ’ घालून मराठा आरक्षण देण्याची मागणी केली. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मराठा क्रांती मोर्चाच्या पुकारलेल्या आंदोलनाची धग राज्यभरात धुमसत आहे.