Next

होमगार्डच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे धरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 14:03 IST2018-09-18T13:53:05+5:302018-09-18T14:03:03+5:30

अकोला : अंतर्गत सुरक्षेसाठी होमगार्ड हे अतिशय महत्त्वाचे काम करीत आहेत. मात्र त्यांना केवळ 400 रुपये मानधन दिले जाते. ...

अकोला : अंतर्गत सुरक्षेसाठी होमगार्ड हे अतिशय महत्त्वाचे काम करीत आहेत. मात्र त्यांना केवळ 400 रुपये मानधन दिले जाते. वाढत्या महागाईच्या काळात हे मानधन अतिशय तुटपुंजे असून, होमगार्डची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या या प्रकाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. होमगार्डसला न्याय द्यावा, या मागणीसाठी मंगळवारी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात होमगार्डचे माजी समादेशक तथा राष्ट्रवादीचे प्रदेश प्रतिनिधी प्रा. विजय उजवणे, राज्य कार्यकारिणी सदस्य गजानन इंगळे, श्रीकृष्ण बोळे आदींसह पदाधिकारी व होमगार्डस सहभागी आहेत.