अकोला - शहरातील अधिकृत वाहनतळांऐवजी इतरत्र वाहन ठेवणा-यांवर कारवाई करण्यासाठी कार्यरत असलेले वाहतूक शाखेचे टोईंग पथक अनेकदा मनमानी करत असल्याचे दिसून येते. कोणतीही पूर्वसूचना न देता दुचाकी वाहने उचलून नेली जातात. मनमानी करणा-या टोईंग पथकातील पोलिस कर्मचा-याला अकोला येथील मध्यवर्ती बसस्थानकावर एका सामान्य नागरिकाने कायदा समजावून सांगत उचललेली वाहने उतरविण्यास भाग पाडले. सोशल मीडियावर हा व्हिडीयो चांगलाच व्हायरल होत आहे.