अकोटमधील पुनर्वसित गावकर्यांनी गाठले मेळघाट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 10:07 PM2017-12-25T22:07:40+5:302017-12-25T22:07:51+5:30
अकोट : आठ दिवसात शेती पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेणार्या पुनर्वसित गावकर्यांनी मेळघाटात जाऊन हक्काची शेती वाहू द्या, शेती ...
अकोट : आठ दिवसात शेती पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेणार्या पुनर्वसित गावकर्यांनी मेळघाटात जाऊन हक्काची शेती वाहू द्या, शेती मिळेल तेव्हा परत येऊ, असा नारा देत पुनर्वसित गावकरी २५ डिसेंबर रोजी अमोना गेट पार करून मेळघाटात घुसले. मेळघाटात जाण्यापासून रोखताना शेकडो पुनर्वसितांच्या समोर वन विभागाचे अधिकारी व पोलीस मात्र हतबल झाले होते.