अकोला, दि. 28 - 'लोकमत'ने केलेला पाठपुरावा आणि खासदार संजय धोत्रे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे रेल्वे प्रशासनाने 'सायन्स एक्सप्रेस'ला अकोला रेल्वे स्थानकावर 27 आणि 28 जुलै असे दोन थांबे दिले. 27 रोजी दिवसभरात 30 हजार विद्यार्थ्यांनी 'सायन्स एक्सप्रेस'ला भेट दिली. पहिल्या दिवसा प्रमाणेच आज दुसऱ्याही दिवशी 'सायन्स एक्सप्रेस' बघण्यासाठी शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक तथा शिक्षकांची अकोला रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी उसळली आहे. यासाठी खासदार संजय धोत्रे व जिल्हाधिकारी अस्तिकुमार पांडेय यांनी जिल्ह्यातील शाळा - महाविद्यालयांना विशेष आवाहन केले होते. रेल्वे स्थानक परिसरात सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.