अकोला, दि.11 - शेतक-यांचा जीवाभावाचा मित्र असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. विदर्भात पोळा सणाला मोठे महत्व आहे. पोळ्याच्या दिवशी बैलांची पूजा केली जाते. तर बच्चे कंपनीला मातीच्या बैलांचे मोठे आकर्षण असते. शहरातील गुलजार पुरा भागात मातीपासून बैल बनविण्याचे काम घरोघरी चालते. मातीचे बैल बनवून ते उन्हात सुकविले जातात. त्यानंतर या बैलांना रंग दिला जातो व सुबक नक्षीकाम केले जाते. या कामात कुटुंबातील सर्व सदस्य मदत करतात.