Next

कृत्रिम प्रक्रियेतून दिला दुर्मिळ बिनविषारी सापांना जन्म, भारतातील पहिलाच प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 03:18 PM2018-06-11T15:18:09+5:302018-06-11T15:18:33+5:30

भारतातून केवळ महाराष्ट्रात क्वचितच भागात आढळणारा पिवळ्या ठिपक्याचा कवड्या बिनविषारी सापाच्या अंडी कृत्रिमरीत्या उबवून पिलांना जन्म दिला. हा प्रकार ...

भारतातून केवळ महाराष्ट्रात क्वचितच भागात आढळणारा पिवळ्या ठिपक्याचा कवड्या बिनविषारी सापाच्या अंडी कृत्रिमरीत्या उबवून पिलांना जन्म दिला. हा प्रकार अमरावती येथील सर्पमित्रांनी १० जून रोजी केला. दोन दिवसांनंतर वनाधिका-यांच्या समक्ष त्यांना जंगलात सोडण्यात आले. भारतातील हा पहिलाच प्रयोग असल्याची प्रतिक्रिया उपवनसंरक्षकांनी दिली.