भारतातून केवळ महाराष्ट्रात क्वचितच भागात आढळणारा पिवळ्या ठिपक्याचा कवड्या बिनविषारी सापाच्या अंडी कृत्रिमरीत्या उबवून पिलांना जन्म दिला. हा प्रकार अमरावती येथील सर्पमित्रांनी १० जून रोजी केला. दोन दिवसांनंतर वनाधिका-यांच्या समक्ष त्यांना जंगलात सोडण्यात आले. भारतातील हा पहिलाच प्रयोग असल्याची प्रतिक्रिया उपवनसंरक्षकांनी दिली.