अमरावतीत अनंत चतुर्दशीला पिण्यासाठी दुषित पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 01:40 PM2018-09-23T13:40:14+5:302018-09-23T13:42:36+5:30
शहरात आधीच डेंग्यू व स्क़ब टायफस या जीवघेण्या आजाराने थैमान घातले आहे.
अमरावती : शहरात आधीच डेंग्यू व स्क़ब टायफस या जीवघेण्या आजाराने थैमान घातले आहे. त्यातच रविववारी अनंत चतुर्दशीला शहरातील बहुतांश गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. त्यातही प्रदूषण होऊ नये, यासाठी छत्रीतलाव व प्रथमेश तलावात ही सोय करण्यात आली होती. मात्र, तेथे उपस्थित भाविकांची तहान भागविण्यासाठी महापालिकेच्यावतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली असून, त्यात शेवाळ व कचरादेखील आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. (व्हिडिओ -मनीष तसे, अमरावती )