अमरावती - अमरावती येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात दुष्कृत्याचे प्रायश्चित्त भोगणाऱ्या हातांनी सुबक गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. वडाळी मार्गावर या मातीच्या मूर्तींच्या विक्री केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. याप्रसंगी कारागृह अधीक्षक रमेश कांबळे, कमलताई गवई प्रामुख्याने उपस्थित होते. मातीच्या गणेशमूर्तींची स्थापना करून पर्यावरणाला हातभार लावण्याचे आवाहन याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी केले. (व्हिडीओ - मनीष तसरे, अमरावती)