अमरावती - भारतीय स्वातंत्र्याच्या बहात्तराव्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय क्रीडा संकुल येथे शाळकरी मुलींच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात आलेले स्वयंसिद्धा उपक्रमातील प्रात्यक्षिकाचे सादरीकरण शाळकरी मुलींनी एक ताल, एका लयात केले. यात जुडो- कराटे, लाठी -काठी आधी स्वरक्षणाचे धडे घेतलेल्या मुलींनी सहभाग घेतला. शहरातील आठवी ते दहावीच्या तब्बल पाच हजार मुली यात सहभागी झाल्या होत्या. (व्हिडिओ - मनीष तसरे अमरावती)