पोहरा बंदी (अमरावती): शासकीय रेशन घेऊन जाणाऱ्या धावत्या ट्रकला अचानक आग लागल्याने ट्रकसह अन्नधान्याचा मोठा साठा जळून खाक झाला. ही घटना पोहरा बंदी येथे शुक्रवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या दोन बंबांच्या मदतीनं दोन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. नजीकच्या पोहरा गावाजवळ ट्रक क्र. एमएच २७- ७४२८ या शासकीय धान्याची वाहतूक करत असलेल्या ट्रकला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यात जवळपास पाच लाखांचं नुकसान झालं. अमरावती अग्निशमन दलाचे कर्मचारी प्रेम सोनकांबळे, प्रवीण राठोड, नीलेश, पठाण, कासम यांनी अथक परिश्रमाने आग आटोक्यात आणली.