अमरावती : शेकडो वर्षांपूर्वी निर्मित ब्रिटिशकालीन वडाळी तलावातील गाळ उपसण्याचे कार्य महापालिकेसह विविध सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने युद्धस्तरावार दोन दिवसांपासून सुरू. १३ हेक्टर परिसरातील या तलावातून ३ मीटरपर्यंत खोलीकरण होत असल्याने पाणी साठवणक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. परिणामी पाणी पातळी वाढणार आहे.