अमरावती - दुष्काळात तेराव्याची भर याप्रमाणे आधीच कमी पावसाळ्यामुळे पाणीटंचाईचे संकट झेलत असलेल्या अमरावती शहरात गुरुवारी सकाळी सात वाजता पाईपलाइनला भगदाड पडून मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. इर्विन चौक ते मालवीय चौक दरम्यान उड्डाणपुलाजवळ सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या बांधकामादरम्यान शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाइन फुटली. यामुळे उड्डाणपुलाच्या पायथ्याशी तळे साचले होते. पाईपलाइन फुटल्याने लाखो लीटर पाणी वाहत गेले. (व्हिडीओ - मनीष तसरे)