बीड : इंधन दरवाढीविरोधात परळीतील शिवाजी चौकात सुरू असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. आंदोलकांनी पेट्रोल पंपाच्या बोर्डवर तुफान दगडफेक केली. दरवाढीच्या संतापातून हा प्रकार झाल्याचे युवक तालुका अध्यक्ष विजय मुंडे यांनी सांगितले.