Next

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जीवनविद्येचे - ज्ञान हाच देव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2020 02:48 PM2020-10-06T14:48:55+5:302020-10-06T14:49:08+5:30

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जीवनविद्येचे - ज्ञान हाच देव

 अगदी बालपणापासून आपल्याला जीवनामध्ये असंख्य गुरु आपले ज्ञान वाढावे यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करत असतात. जीवनामध्ये नेहमी अनुभवी व्यक्तिंकडून घेतलेले ज्ञान हे खूप चांगले असते. आपण कोणत्याही गोष्टीचे ज्ञान जर घेतले तर ते कधीच वाया जात नाही. आपल्यामध्ये सतत ज्या गोष्टीची माहिती आपल्याला माहित नसते त्याचे ज्ञान घेण्याची कला ही अवगत असली पाहिजे. ज्ञानाने आपल्या बुद्धीमध्ये भर पडायला मदत होते. भरपूर ज्ञान घेतल्यामुळे आपल्या बुद्धीला चालना मिळण्यासाठी मदत होते. आयुष्यामध्ये नवीन गोष्टी शिकत असताना त्या गोष्टींचे ज्ञान आत्मसात करताना कधीच कंटाळा करू नका. तसे जर केले तर अधोगती होण्यासाठी सुरुवात होते. म्हणून ज्ञान हाच देव ? यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते तुम्हाला हा व्हिडीओ बघितल्यावर कळेल -