आपल्यातला खजिना कोणता?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 02:58 PM2020-09-22T14:58:59+5:302020-09-30T12:47:51+5:30
आपल्यामध्ये कोणत्या गोष्टीचे कौशल्य भरले आहे याचे आपण भान राखले पाहिजे. आपण आपल्यामध्ये असलेल्या क्षमतेला वाव दिला नाही तर आपली प्रगती होणार नाही. आपण कोणत्या गोष्टी करू शकतो यावर आपला विश्वास असणे फार महत्वाचे आहे. आपल्यामध्ये विशिष्ट प्रकारची क्षमता असते पण आपण ती इतर कोणाला दाखवत नाही. आपल्यामध्ये असलेला खजिना आपण ओळखायला शिकला पाहिजे. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्यातला खजिना कोणता? यावर आपल्याला उत्तम मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा