Next

राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, दोन वाहनं जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 15:51 IST2019-04-10T15:50:10+5:302019-04-10T15:51:21+5:30

नांदुरा तालुक्यातील धानोरा फाट्याजवळ बुधवारी भीषण अपघात झाला. या अपघातात दोन वाहनं जळून खाक झाली आहेत. अपघातानंतर काही वेळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

मलकापूर - नांदुरा तालुक्यातील धानोरा फाट्याजवळ बुधवारी भीषण अपघात झाला. या अपघातात दोन वाहनं जळून खाक झाली आहेत. अपघातानंतर काही वेळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मलकापूरवरून नांदुराकडे दोन वाहनं येत होती. दरम्यान समोर जाणार्‍या वाहनाला मागील बाजूने धडक बसली. या अपघातात अचानक एका वाहनाने पेट घेतला.