Next

Bhaiyyuji Maharaj suicide : ऋषी संकुल झाला ‘मुका’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 20:16 IST2018-06-12T20:15:44+5:302018-06-12T20:16:06+5:30

खामगाव:  अध्यात्माला सामाजिक कार्याची सांगड घालणा-या प.पू. भय्यूजी महाराजांनी रजतनगरी(खामगाव)शी देखील याच माध्यमातून आपल्या नात्याची वीण घट्ट केल्याचे दिसून ...

खामगाव:  अध्यात्माला सामाजिक कार्याची सांगड घालणा-या प.पू. भय्यूजी महाराजांनी रजतनगरी(खामगाव)शी देखील याच माध्यमातून आपल्या नात्याची वीण घट्ट केल्याचे दिसून येते. मध्यप्रदेशातील इंदूरनंतर पश्चिम विदर्भातील खामगाव येथे सन २००५ मध्ये महासिध्दपीठ ऋषी संकुल स्थापन केले. या संकुलाच्या स्थापनेनंतर प.पू. भय्यूजी महाराजांचं खामगावशी घट्ट नातं जोडल्या गेलं. या आश्रमात त्यांचे नियमित येणे जाणे राहायचे. मात्र, आता भय्यूजी महाराजांच्या अकाली जाण्याने सजनपुरी येथील आश्रम ‘मुका’झाला आहे.