थंडीचा पिकांना फटका : एका दिवसात ‘हिरवे रान झाले पिवळे!’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 04:57 PM2018-12-30T16:57:55+5:302018-12-30T17:01:07+5:30
मका व हळद पिकाने हिरवा शालू पांघरुन नटलेले असे हिरवे रान एका दिवसात पिवळे पडल्याचे चित्र बुलडाणा जिल्ह्यातील बहुतांश भागात पाहवयास मिळत आहे.
बुलडाणा : मका व हळद पिकाने हिरवा शालू पांघरुन नटलेले असे हिरवे रान एका दिवसात पिवळे पडल्याचे चित्र बुलडाणा जिल्ह्यातील बहुतांश भागात पाहावयास मिळत आहे. मका व हळद या दोन्ही पिकांना उष्ण व दमट हवामान चांगले मानवते; मात्र जिल्ह्यातील हवामानाचा पारा अत्यंत खाली घसरल्याने शेतातील उभी झाडे वाळली आहेत. वाढत्या थंडीचा मका, हळद व इतर काही पिकांना फटका बसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.