बुलडाणा जिल्ह्यातील 8 तालुक्यांमध्ये तीव्र स्वरूपाचा दुष्काळ आहे. चारा नसल्यामुळे पशुपालकांनी आपली जनावरे विक्रीस काढली आहेत. शेतकरी संघटनांनी वारंवार याबाबत पशु संवर्धन विभागाचे सहआयुक्त, जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्र्यांना निवेदन दिले मात्र अद्याप चारा छावणी सुरू करण्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. खामगावचे आमदार आकाश फुंडकर यांनी सुद्धा उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांची तातडीची बैठक घेऊन चारा छावणी सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी सुद्धा सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांची पाणी समस्या व चारा छावण्या सुरू करण्यासंदर्भात भेट घेतली. मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली दिसून येत नाही. खामगाव बाजार समितीच्या गुरांच्या बाजाराचा हा वृत्तांत..