Next

खामगाव शहरात तीव्र पाणी टंचाईचे सावट, रहिवाशांची पाण्यासाठी वणवण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 11:34 AM2019-05-12T11:34:56+5:302019-05-12T11:35:07+5:30

बुलडाणा -  खामगाव शहरात तीव्र पाणी टंचाईचे सावट आहे. पालिका प्रशासनातर्फे पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यात अपयश आल्याने भरदिवसा ...

बुलडाणा -  खामगाव शहरात तीव्र पाणी टंचाईचे सावट आहे. पालिका प्रशासनातर्फे पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यात अपयश आल्याने भरदिवसा तप्त उन्हात नागरिकांना टँकरची वाट पाहावी लागत आहे. विशेष म्हणजे पालिका प्रशासनातर्फे हे टँकर सुरू करण्यात आले नसून शहरातील काही लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी टँकर सुरू करून नागरिकांना दिलासा दिला आहे. सध्या गेरू माटरगाव धरणातून 15 दिवसांनी पाणीपुरवठा केला जातोय. मात्र त्याठिकाणी अत्यल्प जलसाठा असल्याने पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे, पर्यायी व्यवस्था म्हणून शिर्ला डॅमवरुन आरक्षित जलसाठयातून खामगाव शहराला पाणी पुरवठा करण्याचे नियोजन सुरू आहे.