साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळची घटमांडणी आज सकाळी पार पडली. यामध्ये घटमांडणी केली गेली तिथे सत्तेचे प्रतीक असलेले पान आणि विडा (सुपारी) कायम आहे. पान स्थिर असून त्यावरील नाणंही कायम आहे. सुपारी मात्र किंचित हललेली आहे. त्यामुळे सत्ता स्थिर राहू शकेल असे संकेत आहेत. त्यामुळे राजकीय भविष्यवाणीमध्ये राजाची गादी आणि राजा कायम असून पुन्हा एकदा देशाला स्थिर सरकार येण्याचे अंदाज वर्तवण्यात आले.