बुलडाणा - वैदिक परंपरेचे संकेश्वर पीठाचे शंकराचार्य व वारकरी परंपरेचे गुरूपीठाधीश यांच्या हस्ते स्थानिक कारंजा चौक दुर्गामाता मंदिर समितीच्यावतीने 29 डिसेंबर रोजी माँ नवदुर्गा यज्ञ सोहळ्यास सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला बुलडाणा शहरातून शंकराचार्य व गुरूपीठाधीश यांची सजवलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत महिला व पुरूषांच्या पारंपारीक वेशभुषेचे दर्शन घडले.