चंद्रपूर - जिल्ह्यातील बल्लारपूर आष्टी मार्गावर असलेल्या दहेली गावाजवळचा पूल सोमवारी (दि.२९ )सकाळी ६ च्या सुमारास वाहून गेल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली आहे. येथे राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून तेथे दुसऱ्या पुलाचे काम सुरू आहे. या पुलाच्या बांधकामासाठी त्याला लागूनच एक उपरस्ता पाईप टाकून तयार केला होता. हा उपरस्ताच वाहून गेला आहे.