औरंगाबाद : आपणास पुढे जायचे आहे की मागे, हे अगोदर ठरवून घेतले पाहिजे. डार्विनचा सिद्धांत थेअरी नाही. त्यात वैज्ञानिक तथ्य आहे. त्याच्या आधारावर लोकांनी अंदाज बांधले. ते अंदाज खरे ठरले आहेत. माझ्याकडे काही जुनं आहे, त्याला याचा काही आधार सापडत नाही म्हणून ते चूक आहे, असे म्हणणे चुकीचे असल्याचे परखड मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ व पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.