औरंगाबाद : महाविद्यालयातील प्राध्यापक भरती बंदीविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज सकाळी बेरोजगार युवकांनी मोर्चा काढला. यावेळी पीएचडी, नेट व सेट धारक युवकांनी शासनाच्या प्राध्यापक भरती बंद करण्याच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी केली. यासोबतच शासनाने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी आंदोलकांनी केली.