Video : नीरजकुमार देसाईला २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 05:25 PM2019-03-19T17:25:05+5:302019-03-19T17:25:44+5:30
नीरजकुमार देसाईला आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास देसाईला किल्ला कोर्टात हजर करण्यात आलं.
या प्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी स्ट्रक्चरल ऑडिटरने निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात हिमालय पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट डी. डी. देसाई असोसिएट कंपनीने गेल्या ऑगस्टमध्ये केले होते. त्या वेळी या कंपनीकडून छोट्या-मोठ्या दुरुस्तीचे काम करण्याचे सुचवून पुलाला सुरक्षित अवस्थेत असल्याचे प्रमाणपत्र दिले होते.