धर्मा पाटील आत्महत्या प्रकरण : काँग्रेस-शिवसेनेचा सरकारविरोधात रास्तारोको
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 13:52 IST2018-01-29T13:51:52+5:302018-01-29T13:52:20+5:30
धुळे, जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी न्यायाची मागणी करत विषप्राशन करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे रविवारी (28 जानेवारी) निधन ...
धुळे, जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी न्यायाची मागणी करत विषप्राशन करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे रविवारी (28 जानेवारी) निधन झाले. शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे धर्मा पाटील हे त्रस्त झाले होते. अखेर वैतागून त्यांनी मंत्रालयामध्ये विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेस व शिवसेनेनं धुळ्यातील दोंडाईचा-विखरण रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केले.