धुळे, भाजपा आमदार अनिल गोटेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून दहन करण्यात आले. पाकिस्तानच्या तावडीतून सुखरुप परतलेले जवान चंदू चव्हाणांविरोधात केलेल्या बेताल वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसनं अशा पद्धतीनं निषेध नोंदवला. अनिल गोटे यांनी बुधवारी आपल्याच पक्षाचे खासदार व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरेंविरोधात काढलेल्या पत्रकात भारतीय जवान चंदू चव्हाण यांच्यासाठी भगोडा शब्द वापरला होता. याविरोधात राष्ट्रवादीने निषेध व्यक्त केला आहे.