Next

शब्दांचा धनी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2016 09:37 AM2016-08-18T09:37:39+5:302016-08-18T15:07:39+5:30

ज्येष्ठ गीतकार, कवी, लेखक, दिग्दर्शक गुुलजार उर्फ पूरणसिंह कालरा यांचा १८ आॅगस्ट रोजी वाढदिवस. गेली अनेक वर्षे विविध चित्रपटांच्या दिग्दर्शनाच्या माध्यमातून आणि गीतकार म्हणून त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी लिहिलेल्या गाण्यांच्या माध्यमातून हा दिलेला उजाळा.

ज्येष्ठ गीतकार, कवी, लेखक, दिग्दर्शक गुुलजार उर्फ पूरणसिंह कालरा यांचा १८ आॅगस्ट रोजी वाढदिवस. गेली अनेक वर्षे विविध चित्रपटांच्या दिग्दर्शनाच्या माध्यमातून आणि गीतकार म्हणून त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी लिहिलेल्या गाण्यांच्या माध्यमातून हा दिलेला उजाळा.घर चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेले गीत लोकांना खूप आवडते.गोलमाल चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेले ही गीत लोकांच्या कायम स्मरणात राहणारे आहे.घर चित्रपटातील किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचे हे गाणं खूप गाजले आहे.किनारा चित्रपटातील लता मंगेशकर यांनी खूप हळव्या शब्दात हे गाणं म्हटले आहे.काबुलीवाला चित्रपटातील मन्ना डे यांनी गायलेले हे देशभक्तीपर गीत सर्वांना प्रेरणा देते.दिलसे चित्रपटातील सुखविंदर सिंग आणि सपना अवस्थी यांनी गायलेल्या गाण्याने धमाल उडविली होती.घरोंदा चित्रपटातील भूपिंदरसिंग यांच्या आवाजातील गाणं अजूनही याच काळातील वाटते.आंधी चित्रपटातील किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेले हे गाणे आजही हळवं करतं.स्लमडॉग मिलेनिअर चित्रपटातील सुखविंदर यांनी गायलेल्या गाण्याने गुलजार यांना सातासमुद्रापार प्रसिद्धी मिळाली.परिचय चित्रपटातील किशोर कुमार यांचे हे गीत खूप गाजले.किनारा चित्रपटातील भूपिंदर आणि लता मंगेशकर यांनी गायलेले हे गाणे प्रसिद्ध आहे.मौसम चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेले गाणे अजूनही लोकांच्या ओठावर आहे.मासूम चित्रपटात लता मंगेशकर यांनी गायलेले हे गाणे गाजले आहे.मरासिम या अल्बममधील जगजित सिंग यांनी गायलेली ही गजल हळवी करते.