गडचिरोलीतील या गावात प्यावे लागतेय खड्ड्याचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 08:58 PM2018-04-03T20:58:37+5:302018-04-03T20:59:46+5:30
एकीकडे आता खेड्यापाड्यात शुद्धीकरण केलेल्या पाण्याच्या कॅन वापरल्या जात असल्या तरी गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात मात्र चक्क खड्ड्यातील अशुद्ध ...
एकीकडे आता खेड्यापाड्यात शुद्धीकरण केलेल्या पाण्याच्या कॅन वापरल्या जात असल्या तरी गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात मात्र चक्क खड्ड्यातील अशुद्ध पाणी पिण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. तुमरकोडी या गावातील दोन्ही हातपंप निकामी झाल्याने येथील नागरिकांना पाणीच मिळेनासे झाले. परिणामी खड्ड्यातील पाण्यातून त्यांना तहान भागवावी लागत आहे. पण या गंभीर बाबीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.