दक्षिण गोव्याच्या सांगे गावातील वीरभद्र उत्सव काल उत्साहात साजरा झाला. शेकडो वर्षांची परंपरा असलेला हा उत्सव सांगेतील सारस्वत समाजातर्फे केला जातो. यावेळी आकर्षक रंगभूषा व वेशभूषा केलेला वीरभद्र हातात तलवारी घेऊन नृत्य सादर करतो. याआधी मोरावर स्वार झालेली युवती सरस्वती नृत्य करते.