गोव्याचे मुख्यमंत्री व भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी (17 मार्च) संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला. ते स्वादुपिंडाशी संबंधित कर्करोगाशी झुंज देत होते. त्यानंतर त्यांचं पार्थिव पणजीतल्या भाजपा कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे.