Next

उत्पल पर्रिकरांसाठी Shivsena धावली, Bjpची डोकेदुखी वाढली | Utpal Parrikar | Goa Election 2022

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 02:40 PM2022-02-02T14:40:22+5:302022-02-02T14:40:57+5:30

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या गोवा निवडणुकीत केंद्रस्थानी आहेत. प्रभारी म्हणून त्यांनी गोव्यात आखलेली रणनिती असो, राजकीय डावपेच असो, काही नेत्यांना पक्षात घेणं असो किंवा पर्रिकरांबाबतच्या निर्णयावर ठाम राहणं असो... फडणवीसांनी सर्व बाबतीत महत्वाची भुमिका बजावलीय. पण काही ठिकाणी झालेली बंडखोरी ही फडणवीस आणि भाजपसाठी डोकेदुखी ठरतेय.. त्यात शिवसेनेनेही गोव्यात आपली ताकद लावल्याने फडणवीस त्याबाबतीतही विशेष लक्ष देतायत.. पण आता शिवसेनेच्या एका गोष्टीमुळे फडणवीसांची डोकेदुखी आणखी वाढणार आहे. ती गोष्ट म्हणजे उप्तल पर्रिकरांना शिवसेनेने दिलेला पाठिंबा..