Next

Utpal Parrikar यांचा झंझावात, संघही प्रचारात नाही...Devendra Fadanvis कोंडी कशी फोडणार? Goa

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 08:33 PM2022-02-10T20:33:35+5:302022-02-10T20:33:57+5:30

देवेंद्र फडणवीस भाजपचे गोवा विधानसभा निवडणूक प्रभारी आहेत, खूप प्रयत्न करुनही ते उत्पल पर्रीकरांचं बंड ते थांबवू शकले नाहीत. फडणवीस गोव्या आले आणि चार भाजपच्या आमदारांनी राजीनामा दिला. त्यातले दोन तर पाच वर्ष मंत्री राहिले होते. पण आता परत उत्पल पर्रीकरांनी देवेंद्र फडणवीसांची डोकेदुखी वाढवलीय. याचं कारण म्हणजे उत्पल पर्रीकरांना पणजीतून प्रचंड चांगला पाठिंबा मिळतोय, उत्पल यांच्या छोटेखानी रॅलींना गर्दी होतेय, उत्पल यांच्याच बाजूनं पारडं झुकतं की काय अशी परिस्थिती आहे. त्यामुळे भाजप आणि फडणवीसांची डोकेदुखी वाढलीय. आता हे कमी होतं म्हणून की काय उत्पल यांच्या पणजी मतदारसंघासह अनेक ठिकाणी संघाचे कार्यकर्तेच प्रचारात उतरताना दिसत नाहीयेत. त्यामुळे फडणवीस ही दुहेरी कोंडी कशी फोडणार, उत्पल यांचा झंझावात फडणवीस कसा रोखणार, स्वयंसेवकांना परत प्रचारात कसं आणणार, अखेर गोवा भाजपत अजूनही नाराजी का खदखदतेय यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सर्वात आधी बघुयात पणजीत काय चाललंय, उत्पल यांनी फडणवीसांची डोकेदुखी का वाढवली?...