Next

World Heart Day : Foods That Keep Your Heart Healthy | हृदय निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 06:33 PM2020-09-29T18:33:55+5:302020-09-29T18:34:42+5:30

आपल्या शरीरात हृदय एक असा अवयव आहे जो रक्ताभिसरणाचं काम करतो. त्यामुळे आपल्या शरीरातील प्रत्येक भागाला रक्त पुरवलं जातं आणि शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण योग्य प्रमाणात राहतं. पण आजच्या अतिशय धकाधकीच्या आयुष्यात 'हार्ट अटॅक' आणि 'कार्डियक अरेस्ट' यांसारख्या हृदयाच्या आजारांना अनेक जण बळी पडताना दिसतात. जगभरात हृदयसंबंधी आजारांबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २९ सप्टेंबर हा दिवस 'वर्ल्ड हार्ट डे' किंवा 'जागतिक हृदय दिवस' म्हणून साजरा केला जातो. हृदय निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स आणि सोबतच आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असावा हे जाणून घेऊया