कोव्हिड रुग्णालयात आग, 52 जणांचा मृत्यू | Iraq Covid Ward Fire | Internationa News
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 02:18 PM2021-07-13T14:18:27+5:302021-07-13T14:18:52+5:30
जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय.... रुग्णांच्या संख्येने तब्बल 18 कोटींचा टप्पा पार केलाय... लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागलाय.... याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना घडतायत.... अशीच एक भयंकर घटना समोर येतेय.... रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडलेय.... या आगीत 52 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळतेय.... इराक मधील रुग्णालयाच्या कोरोना व्हायरस आयसोलेशन वॉर्ड मध्ये लागलेल्या आगीत कमीत कमी 52 जणांचा मृत्यू झालाय...