Next

‘मिस आफ्रिके’च्या केसांना स्टेजवर लागली आग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 04:15 PM2018-12-30T16:15:31+5:302018-12-30T16:18:17+5:30

‘मिस आफ्रिका 2018’ या सौंदर्यस्पर्धेच्या अंतिम सोहळ्यादरम्यान स्पर्धेची विजेती ठरलेल्या सौंदर्यवतीच्या केसांना आतषबाजीमुळे आगलागल्याची घटना समोर आली आहे.

‘मिस आफ्रिका 2018’ या सौंदर्यस्पर्धेच्या अंतिम सोहळ्यादरम्यान स्पर्धेची विजेती ठरलेल्या सौंदर्यवतीच्या केसांना आतषबाजीमुळे  आग लागल्याची घटना समोर आली आहे. आयोजकांनी प्रसंगावधान राखून  आग  विझवल्यामुळे सौंदर्यवती डॉरकस कँसिंडे थोडक्यात बचावली आहे. सोहळ्यादरम्यान सुरू असलेल्या आतषबाजीने ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

टॅग्स :आगfire