Next

भारत पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत - ट्रम्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 13:28 IST2019-02-23T13:27:49+5:302019-02-23T13:28:59+5:30

वॉशिंग्टन - पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत. हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमधील तणावात ...

वॉशिंग्टन - पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत. हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमधील तणावात आणखी भर पडली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमधील संबंध आता धोकादायक स्थितीत असल्याचं म्हटलं आहे. तसेच भारताने पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात 40 जवान गमावले आहे आणि भारत पाकिस्तानविरोधात खूप कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहेत, त्यांची मनस्थिती मी समजू शकतो, असे ट्रम्प यांनी सांगितले आहे.